आयुष्य कधी कधी अस का असते ?
सुरळीत चाललेले असताना
मध्येच का थांबते?
कळत नाही त्या क्षणी नेमके कसे वागायचे?
काहीतरी घडवण्याचा विचार करायचा
कि काहीतरी घडेल याची वाट बघायची ?
आपण जागीच थांबतो पण वेळ मात्र निघून जाते ,
आणि त्या धावत्या वेळेतच काहीतरी घडून जाते.
हे नेमके तेच घडते ज्याची वाट बघायची असते.
No comments:
Post a Comment